लोकप्रतिनिधींबद्दल गैरसमज निर्माण करणे थांबवा!

33
ajit-pawar-in-speech

सामना प्रतिनिधी, पुणे

लोकप्रतिनिधींबद्दल संशयाचे वातावरण तयार करण्यासाठी काही तरी बोलायचे अशी सवयच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना लागली आहे. त्यांनी विरोधी पक्षातील आमदारांना अंधारात भेटण्यापेक्षा त्यांना वर्षा बंगल्यावरच बोलावून घ्यावे. तेथे सीसीटीव्ही तसेच इतर सुविधाही असतात. तेथे बसून चर्चा करावी. परंतु त्यांनी लोकप्रतिनिधींबद्दल गैरसमज निर्माण करण्याचे काम थांबवावे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली.

बालगंधर्व रंगमंदिरात गुरूजन पुरस्कारांच्या वितरणानंतर पवार यांनी माध्यमांशी बोलताना पाटील यांच्यावर टीका केली. ‘पाटील हे वरिष्ठ नेते असून एका पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आहेत. ते राज्य सरकारमधील मंत्री असून विधान परिषदेतील नेते आहेत. लोकप्रतिनिधींबद्दल गैरसमज पसरविण्याचे काम त्यांनी थांबवले पाहिजे. काही गोष्टी राजकीय दृष्टिकोनातून बोलल्या जातात. परंतु ते आता काहीही बोलत आहेत. त्यांच्या अशा बोलण्याने माध्यमांना खाद्य मिळते. त्यामुळे उलटसुलट बातम्या येतात. नागरिकांना आपल्या लोकप्रतिनिधीबद्दल उगाचच शंका निर्माण होते, असे पवार म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या