वाचाळवीरांची संख्या वाढतेय; अजित पवार यांचा पडळकरांना टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बोलताना प्रत्येकाने भान ठेकूनच बोलले पाहिजे या बद्दल दुमत नाही, सध्या वाचाळवीरांची संख्या कमालीची काढत आहे, असे असले तरी लोकशाही मध्ये प्रत्येकाला आपले मत मांडायचा अधिकार आहे, राजकीय मते सहकारी बँकेच्या सभेत मांडू नयेत, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिला.

बारामती सहकारी बँकेच्या बैठकीत एका कार्यकर्त्याने गोपीचंद पडळकर यांनी अजित पकार यांच्या बद्दल काढलेल्या उदगाराचा संदर्भ घेत त्यांना काळे फासण्याचा इशारा दिला. या कार्यकर्त्याचे बोलणे ऐकून घेतल्यावर स्वत: माईक हातात घेत अजित पवार यांनी तुम्ही मांडलेल्या भावना समजल्या, मात्र लोकशाहीत प्रत्येकाला मतस्वातंत्र्य आहे, कोणी काय मत व्यक्त करावे हा संबंधिताचा प्रश्न आहे, सहकारी बँकेच्या सभेत राजकीय मते मांडू नयेत, कारण इथे सर्वच राजकीय पक्षांना मानणारे सभासद आहेत, हे राजकीय व्यासपीठ नसल्याचे सांगत अजित पवार यांनी संबंधित कार्यकर्त्याला सल्ला दिला.