माजी संरक्षणमंत्र्यांच्या ड्रायव्हरने केली आत्महत्या

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

माजी संरक्षणमंत्री आणि काँग्रेस नेते ए. के. अँटनी यांच्या ड्रायव्हरने (वाहन चालक) घरी गळफास लावून घेतला. या आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही.

अँटनी यांचा ड्रायव्हर मूळचा उत्तर प्रदेशमधील फतेहपूरचा रहिवासी होता. तो अँटनी यांच्यासाठी काम करत असल्यामुळे दिल्लीत जंतर-मंतर भागातील घरी राहात होता. तिथेच त्याने आत्महत्या केली. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अँटनी यांच्या ड्रायव्हरने गुरुवारी रात्री आत्महत्या केली. मात्र या संदर्भात पोलीस ठाण्यात आज (शुक्रवारी) दुपारी १२च्या सुमारास कळवण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या