
विद्यार्थी हे सरस्वतीचे पूजकच. या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देतात, त्यांच्या डोक्यावर काठ्या हाणायच्या नसतात. विद्यार्थ्यांना एकटे गाठून मारहाण करण्यात आली हे आम्ही सहन करणार नाही, अशा शब्दांत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी केंद्र सरकारवर हल्ला केला. तरुणांना काही काळ फसवता येईल. त्यांना मेस्मराइज करता येईल, पण हे नेहमीच करता येणार नाही असा सल्लाही त्यांनी सरकारला दिला.
93व्या साहित्य संमेलनाचे शानदार उद्घाटन आज येथे झाले. या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यापासून फादर दिब्रिटो यांना विरोध होत होता. एवढेच नव्हे तर, उद्घाटक ना. धों. महानोर यांनाही काल ब्राह्मण महासंघाने पत्र पाठवून उद्घाटनाला जाऊ नका असे बजावले होते. मात्र या कोणत्याही धमक्यांना भीक न घालता संमेलनाचे उद्घाटन झाले आणि आपल्या अध्यक्षीय भाषणात दिब्रिटो यांनी साहित्यिक आणि केंद्र सरकारला जोरदार तडाखे लगावले.
दिब्रिटो म्हणाले, टीकाकारांना मी भीत नाही. माझी भीती मला सोडून गेली आहे. मात्र तुम्हाला कुणाची भीती वाटते, असा सवाल करून समस्त साहित्यिकांनीच आता याबाबत भूमिका घ्यायला हवी, असे दिब्रिटो म्हणाले. काही लोक स्वतंत्र हिंदुस्थानात अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा वापर केला म्हणून तुरुंगात खितपत पडले आहेत हे दुर्भाग्य असल्याचेही ते म्हणाले. ‘जेएनयू’ प्रकरणावर भाष्य करताना दिब्रिटो यांनी, सरस्वतीच्या पूजकांवर लाठय़ा चालवणे हे कदापि सहन करणार नाही असेही ठामपणे बजावले.
व्यासपीठाकर अध्यक्ष फादर दिब्रिटो, महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराक ठाले पाटील, उद्घाटक कवी पद्मश्री ना. धों. महानोर, माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, प्रा. फ. मु. शिंदे, डॉ. सदानंद मोरे, श्रीपाल सबनीस, डॉ. अक्षयकुमार काळे, लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. अरुणा ढेरे, महामंडळाच्या उपाध्यक्ष विद्या देवधर यांच्यासह साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱयांची उपस्थिती होती. सोहळ्याची सुरुकात तुळजाभकानीच्या पारंपरिक गोंधळगीताने करण्यात आली. राजाभाऊ कदम गोंधळी आणि सहकाऱयांनी खडय़ा आकाजात पारंपरिक गोंधळ सादर केला.
यावेळी सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार मधुकर चव्हाण, आमदार बाबासाहेब पाटील, सतीश चव्हाण, विक्रम काळे, माजी आमदार सिद्रामप्पा आलुरे गुरुजी, कैजिनाथ शिंदे, उल्हास पवार, जि. प. उपाध्यक्षा अर्चना पाटील आदींचा सत्कार करण्यात आला.
मराठी ही मनाची भाषा, तिला राजभाषेचा दर्जा द्या
इंग्रजी शाळांपेक्षा मराठी शाळा जपल्या पाहिजेत. कारण मराठी ही मनाची भाषा असल्याने राज्य सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, अशी मागणी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी केली. पर्याकरण आणि साहित्य यांचा जवळच संबंध आहे. कारण कागद झाडापासून येतात. हा विचार साहित्यिकांनी केला पाहिजे. तुटलेला संवाद, परमसत्य आम्ही नाकारलेले आहे, आम्हाला धाक राहिलेली नाही. सृजनशक्ती संपत चाललेली आहे. निसर्गाबरोबरच संवाद संपत चाललेला आहे. बेसुमार वृक्षतोड केली जात आहे. सत्यासोबत संवाद तुटला आहे. माणसातील तुटलेला संवाद यामुळे पर्यावरण बिघडले आहे. 16 वर्षांची ग्रेटा जगाला विकासाचा संदेश देते यातून पर्यावरण किती महत्त्वाचे आहे हे ध्यानात घेतले पाहिजे. म्हणून मानवी पर्यावरण निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी नैतिकता आणि अध्यात्माच्या काड्या उभ्या करायच्या आहेत असे दिब्रेटो म्हणाले. वाचन संस्कृती जपणे गरजेचे आहे. वाचन संस्कृतीत कुणाला काहीही शिकण्याची मुभा आहे, पण केळ कुठे आहे? मुलांचे वाचनाचे वय निघून जात आहे. याचा विचार झाला पाहिजे असे दिब्रेटो यांनी सांगितले.
मी संतांना विसरू शकत नाही!
मी साहित्याच्या मंदिरातील सेवक असून संतांच्या सहवासात महाराष्ट्रात वाढलो आहे. मी येशूचा उपासक असून त्याची सावली जरी माझ्यावर पडली तरी मी स्वतःला भाग्यवान समजेन. जो मराठी आहे त्याला संतांची गोडी लागलीच पाहिजे. त्या संतांनी माझा आध्यात्मिक पिंड जोपासला आहे. मी संतांना विसरू शकत नाही. विशेष म्हणजे, माझ्या लाडक्या तुकोबांना तर नाहीच विसरणार, असेही दिब्रिटो म्हणाले.




























































