
एकीकडे मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकीआधी भाजपचे नेते मोहित कंबोज हे प्रचारापासून दूर असल्याचे दिसत होते. दरम्यान मुंबईमध्ये निवडणूकीसाठी मतदानाला सुरुवात झाली त्यावेळी मोहित कंबोज आणि महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्यात एक बैठक पार पडल्याचे समोर आले. त्यानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलनुसार भाजप व मिंधे गटाला बहुमत मिळणार असा अंदाज वर्तविण्यात आला होता. या सर्व घडामोडींवर शिवसेना राज्य संघटक अखिल चित्रे यांनी एक पोस्ट टाकत क्रोनोलॉजी शेअर केली आहे.
”क्रोनॉलॉजी समजून घ्या… 1. भाजपा निवडणुकीत पाण्यासारखा पैसा ओततो… 2. तेव्हा कंबोज अमेरिकेत असतो… 3. मग कंबोज निवडणूकीच्या आधी हिंदुस्थानात परततो … 4. भाजपाच्या विजयाचे आकडे देतो… 5 तसेच एक्झिट पोल येतात… आणि तरीही जनमानस चिंतेत आणि फक्त कंबोजचा पक्ष आसुरी आनंदात असतो ! हेच आपण पाहतोय… आणि निवडणूक निकालात हे कंबोजचे आकडे खरे ठरले तर ‘कंबोज : अमेरिका : ईव्हीएम : भाजपा : अघोरी बहुमत’ यांचा परस्परांशी काहीही संबंध आढळला तर तो महाराष्ट्र्राने योगायोग का समजावा ? पण आता वाचा आणि निमूटपणे सहन करा ! असे अखिल चित्रे यांनी ट्विट केले आहे.































































