
दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६’ (India AI Impact Summit 2026) दरम्यान युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आंदोलन केले. यावेळी या कार्यकर्त्यांनी अंगावरील कपडे काढून ‘PM is Compromised’ असे लिहिलेले टी-शर्ट फडकावले. त्यावरून समाजवादी पार्टीचे अध्यक्ष व खासदार अखिलेश यादव यांनी काँग्रेसला फटकारले आहे.
”काँग्रेसच्या शर्टलेस आंदोलनाने देशाची लाज घालवली आहे. आपल्यात अंतर्गत वाद असतील. संपूर्ण देशाला माहित आहे की भाजप खोटारडी आहे. पण परदेशी पाहुण्यांसमोर अशा प्रकारे आंदोलन काँग्रेसने करायला नको होते. त्याने आपल्या देशाची लाज गेली आहे”, असे अखिलेश यादव म्हणाले.
अमेरिका हिंदुस्थान व्यापार कराराविरोधात आंदोलन
युथ काँग्रेसने या आंदोलनाबाबत अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले होते. “पंतप्रधान मोदींनी या एआय समिटमध्ये देशाची ओळख आणि डेटाचा व्यापार केला आहे,” असा आरोप कार्यकर्त्यांनी केला होता. हिंदुस्थान-अमेरिका व्यापार करार आणि डेटा सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून हे आंदोलन करण्यात आले होते.


























































