अकोल्यात आढळले कोरोनाचे चार पॉझिटिव्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अकोला शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून, मंगळवार, 12 मे रोजी यामध्ये आणखी चौघांची भर पडली आहे. मंगळवारी सकाळी प्राप्त अहवालांनूसार दीड वर्षीय बालकासह चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

चारही रुग्ण हे तारफैल भागातील भवानीपेठ परिसरातील असल्याची माहिती आहे. यामध्ये दीड वर्षाचा बालक, आठ वर्षांचा मुलगा, 23 वर्षीय महिला व 62 वर्षाचा पुरुष यांचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. चार नवे पॉझिटिव्ह आढळल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 163 वर पोहचली आहे.

पश्चिम वऱ्हाडात अकोला शहर हे कोरोना संसर्गाचे हॉटस्पॉट ठरले आहे. पहिला रुग्ण सात एप्रिल रोजी आढळलेल्या अकोल्यात महिनाभरात दीडशेहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांचाही आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे.