इंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात कडकडीत बंद

852

इंदुरीकर महाराज यांच्या समर्थनार्थ आज अकोले तालुका बंदची हाक दिली असून रविवारी सकाळपासून 100% अकोले तालुका बंद ठेवण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांचा निषेध यावेळी करण्यात येत आहे.

इंदुरीकर महाराजांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात सध्या राज्यभर पडसाद उमटू लागले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या टीकासुद्धा होऊ लागलेल्या आहेत. असे असताना महाराजांनी आपली भूमिका दोन दिवसांपूर्वीच लेखी स्वरूपामध्ये स्पष्ट केली आणि प्रशासनाने पाठवलेला नोटिशीला उत्तर दिलेले आहे. मात्र दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी महाराजांच्या तोंडाला काळे फासू असे वक्तव्य केल्यामुळे त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. या व्यक्तव्याच्या निषेधार्थ आणि इंदुरीकर महाराजांच्या समर्थानार्थ रविवारी अकोले तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून मोठी गर्दी या मोर्चामध्ये दिसून येत आहे. दरम्यान, इंदोर ते अकोले मोटारसायकल रॅली काढली जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या