जामखेडमध्ये सरकारविरुद्ध आक्रोश मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, जामखेड

भाजपा सरकारचे निवडणुकीच्या यशाचे मुख्य कारण जनाधार नाही तर ई.व्ही.एम. मशीन आहे. याच मशीनची प्रतिकात्मक प्रेतयात्रा व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आक्रोश मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शनिवार २८ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता पंचायत समितीच्या कार्यालयापासून ते तहसील कार्यालयापर्यंत शेतकऱ्यांसह वाजत गाजत भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.

उडीद व मूग खरेदी केंद्र सुरू करावे, शेतीमालाला हमीभाव देऊन स्वामीनाथन आयोग लागू करण्यात यावा, शासनाने मागील वर्षी खरेदी केलेल्या उडीद, हरभरा व तुरीचे पैसे त्वरित अदा करण्यात यावेत, बोंडआळीच्या अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांना त्वरित अनुदान द्यावे, दुधाला तीस रुपये लिटर भाव देण्यात यावा, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी खरीप पिकाला अनुदान देण्यात यावेत व जामखेड तालुका अवर्षण प्रवणग्रस्त जाहीर करावा, भूजल व्यवस्थापन अधिनियम २००९ते २०१८ कायदा रद्द करावा, पेट्रोल डिझेल दरवाढ कमी करावी, वीज दरवाढ कमी करावी, मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी अशा विविध मागण्या या मोर्चा दरम्यान करण्यात येणार आहेत.

वाढती महागाई आणि त्यातच पावसाने पाठ फिरवल्याने संपूर्ण तालुक्यावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. त्यातच तलाव कोरडे पडत चालले आसल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. अशा दुहेरी संकटात सापडलेला शेतकरी सध्या मेटाकुटीला आला आहे. शासनाने ताबडतोब निर्णय घेऊन तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशा मागण्या केल्या.

summary- akrosh morcha against state govt