
बॉलीवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार लवकरच ‘बेलबॉटम’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. गुरुवारी या चित्रपटाची टींम चार्टर्ड प्लेनने यूकेला रवाना झाली आहे. लॉकडाऊननंतर तब्बल चार महिन्यांनी परदेशात जाऊन चित्रीकरण करणारा हा बॉलीवूडचा पहिलाच चित्रपट ठरला आहे.
गुरुवारी अक्षय कुमार आपल्या कुटुंबासह मुंबई विमानतळाकर स्पॉट झाला. बेलबॉटमच्या टीममधील लारा दत्ता, हुमा कुरेशी, दिग्दर्शक रणजित तिवारी, निर्माते जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख हेदेखील यूकेला रवाना झाले आहेत. हा चित्रपट पुढच्या वर्षी 2 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटानंतर अक्षय लगेचच आनंद एल. राय यांच्या ’अतरंगी रे’ आणि त्यानंतर ’रक्षाबंधन’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. अक्षयचे दोन चित्रपट रिलीजसाठी तयार आहेत. त्यातील ‘लक्ष्मी बॉम्ब’ डिस्नी प्लस हॉटस्टारवर तर ‘सूर्यवंशी’ थिएटर सुरू झाल्यावर प्रदर्शित होईल.





























































