पूरग्रस्तांना 2 कोटींची मदत करणारा अक्षय म्हणतो, माझ्याकडे भरपूर पैसे, फक्त…

332

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने आसाममधील पूरग्रस्त लोकांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि काझीरंग अभयारण्यातील सुरक्षा अभियनासाठी 2 कोटी रुपयांची मदत केली आहे. याआधीही त्याने अनेकवेळा लष्करी जवानांच्या कुटुंबीयांसाठी आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये सर्वस्व गमावलेल्या लोकांना सढळ हाताने मदत केली आहे. याच संदर्भात त्याला विचारणा करण्यात आली तेव्हा माझ्याकडे भरपूर पैसे असल्याचे उत्तर त्याने दिले आहे.

‘मिशन मंगल’या आगामी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चप्रसंगी मानवासह प्राण्यांचाही विचार करणाऱ्या अक्षय कुमारच्या विचारांचे कौतुक करण्यात आले. आसाम पूरग्रस्तांना केलेल्या मदतीबाबत त्याला विचारण्यात आले तेव्हा तो हसत म्हणाला की, ‘माझ्याकडे भरपूर पैसे आहेत. फक्त पुराचे फोटो ट्वीट करून सहानुभूती व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. मला जेवढी शक्य होईल तेवढी मदत करण्यात मी तत्पर असतो.’

आसाम पुराबाबत बोलताना अक्षय म्हणाला, ‘मी परवा एक फोटो पाहिला होता. एक महिला आपल्या मुलाला घेऊन पाण्यातून बाहेर पडत होती. माझ्यासोबत हे घडले नाही हा विचार करून मी स्वत: नशीबवान समजतो. जेव्हा मी तो फोटो पाहिला तेव्हा हे माझ्यासोबत, माझ्या मुलासोबत, पत्नीसोबतही होऊ शकते हा विचार माझ्या मनात आला. त्याचवेळी मी मदतीचा निर्णय घेऊन टाकला.’ तसेच अक्षयने पूरग्रस्तांना सर्वांनी मदत करण्याचे आवाहनही केले.

आपली प्रतिक्रिया द्या