अक्षय कुमारचा विकेंड ठरला एकदम ‘हाऊसफुल’

अक्षय कुमारचा ‘हाऊसफुल 5’ ने प्रदर्शनानंतर दोन दिवसांत 56 कोटी रुपयांचे कलेक्शन केले. मेकर्सने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी 32.38 कोटींचे तर रविवारी 24.35 कोटींचा बिझनेस केला. याच दरम्यान अक्षय कुमार मास्क लावून थिएटरबाहेर प्रेक्षकांमध्ये पोचला. अक्षयने हातात माईक घेऊन लोकांना सिनेमा कसा वाटला, हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला. मास्क लावल्यामुळे कुणी त्याला ओळखू शकले नाही. अक्षय कुमार लवकरच सिद्धार्थ आनंदच्या भयपटात दिसेल. लोककथेवर आधारित हा चित्रपट आहे. अद्याप याची अधिकृत घोषणा झालेली नाही.