‘अलर्ट सिटीजन फोरम’ यांच्या इकोफ्रेंडली पणत्या

पूजा सोनवणे

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर य़ेऊन ठेपली असून घरोघरी दिवाळसणाची लगबग सुरू आहे. दिवाळी हा रोषणाईचा सण असल्याने रंगीबेरंगी कंदील आणि पणत्यांनी बाजारही सजले आहेत . त्यातही दिवाळी हा मांगल्याचा सण असल्याने जर तुम्हांला हा सण तितक्याच सात्विक वातावरणात साजरा करायचा असेल तर त्यासाठी ‘अलर्ट सिटीजन फोरम’ या स्वयंयेवी संस्थेने तुमच्यासाठी शेणापासुन आणि नारळाच्या करवंट्यांपासून तयार करण्यात आलेल्या इकोफ्रेंडली पणत्या आणल्या आहेत.

ujwala3

जोगेश्वरी येथे ही संस्था असून या संस्थेत आदिवासी व गरजू महिलांना रोजगार प्रशिक्षण दिले जाते. याअंतर्गत येथील बचत गटातील आदिवासी महिलांनी पर्यावरणाला अनुकूल अशा पणत्या व दिवे बनवले आहेत. यात नारळाच्या करवंट्यांपासून दिवे तयार करण्यात आले आहेत. तर शेण आणि गोमूत्र यापासून पणत्या तयार करण्यात आल्या आहेत. हे दिवे व पणत्या आकर्षक दिसाव्यात यासाठी नैसर्गिक रंगाचा वापर करण्यात आला आहे.

‘अलर्ट सिटीजन फोरम’ संस्थेतर्फे दिवाळी प्रमाणे रक्षाबंधनालाही पर्यावरणस्नेही राख्या बनवल्या जातात. त्यांना मोठ्या प्रमाणावर मागणीही आहे. यामुळे या दिवाळीला  काहीतरी नवीन करण्याचे ठरवले. असे संस्थेने म्हटले आहे. पण या ईको  फ्रेंडली पणत्या  बाजारात उपलब्ध नसून संस्थेमार्फत तुम्हांला खरेदी कराव्या लागणार आहेत.  आदिवासी महिलांना रोजगार प्राप्त व्हावा. त्यांना चांगले उत्पन्न मिळावे व  रोजगारासाठी होणाऱ्या स्थलांतराचे प्रमाण कमी व्हावे हा यामागचा उ्द्देश्य आहे.

आपली प्रतिक्रिया द्या