सावधान…केवळ एका टेक्स्ट मेसेजने डेटा हॅकर्सकडे जाणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऍण्ड्रॉइड सिस्टीममध्ये बग घुसला आहे. त्यामुळे साधा टेक्स्ट मेसेज करतानाही जरा सावधान राहावे लागणार आहे. कारण आपण नकळत एखाद्या अनोळखी माणसाला टेक्स्ट मेसेज केला तर त्याद्वारे आपल्या मोबाईलमधील सर्व खासगी डेटा वापरण्याची परवानगीच आपण त्याला देणार आहोत. सध्या तरी या व्हायरसचा धोका केवळ गुगल ऍण्ड्रॉइड हॅण्डसेट वापरणाऱ्या युजर्सनाच असला तरी त्यानंतर इतर सिस्टीमचे मोबाईल्सही हॅकर्सचे लक्ष्य ठरू शकतात.

विशेष म्हणजे या व्हायरसमुळे युजर्सची वेब हिस्ट्री हॅकर्सना पाहता येणार असून युजर्सचे इनकमिंग व आऊटगोइंग कॉलवरही तो लक्ष ठेवू शकणार आहे. यामुळे हॅकर आपल्या मोबाईलमधून कोणतीही माहिती चोरून घेऊ शकतो. सध्या तरी प्रत्येक महिन्याला जवळपास 250 कोटी नवीन लोक ऍण्ड्रॉइड फोन वापरायला सुरुवात करतात. त्यामुळे या व्हायरसमुळे फार मोठय़ा संख्येने लोकांना फटका बसण्याची शक्यता आहे. सोनी, सॅमसंग, हुवावे, एलजी अशा बडय़ा स्मार्टफोन कंपन्यांचे ऍण्ड्रॉइड हॅण्डसेटस्ही या व्हायरसची शिकार होऊ शकतात.

असा होतो फोन हॅक

हा खास प्रकारचा व्हायरस युजर्सच्या फोन नेटवर्कद्वारे कुठूनही फोनची सेटिंग अपडेट करू शकतो. युजर्सला माहीतही नसताना त्याच्या हॅण्डसेटवरून टेक्स्ट मेसेज पाठवून हे हॅकर्स मोबाईलमधील सर्व माहिती ऍक्सेस करतात. साधारणपणे मोबाईलमधील सिस्टीम ते ऑथेंटिकेट करत नाही, पण व्हायरसमुळे ते आपोआप ऑथेंटिकेट होते आणि फोन हॅक होतो.