अलिबाग पेण मार्गावर डंपरची दुचाकीला धडक, 1 ठार तर तिघे जखमी

622

अलिबाग पेण मार्गावर तिनवीरा धरणाजवळ भरधाव वेगात निघालेल्या डंपरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील 1 जण जागीच ठार तर दोघे जखमी झाले आहेत. योगेश रामबकास उमरिया असे मृत तरुणाचे नाव आहे तर संदीप थळे व शादाब छपेकर हे जखमी झाले आहेत. संदीप थळे याची प्रकृती चिंताजनक असून त्याला उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आले आहे.

योगेश, संदीप आणि शादाब हे तिघे मोटारसायकलवरून अलिबाग येथून पेणच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी पुढे चाललेल्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या डंपरवर त्यांची मोटर सायकल आदळून हा अपघात झाला. अलिबाग तालुक्यात अपघाताची मालिका काही दिवसांपासून सुरू असून तीन दिवसात पाच जण मयत झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या