महावितरणचा कनिष्ठ अभियंता लाच लुचपतच्या जाळ्यात

732

अलिबाग तालुक्यातील वरसोली येथील लॉजिगचे वीज बिल कमी करण्यासाठी 1 लाख 20 हजारांची लाच मागतल्या प्रकरणी महावितरणचा कनिष्ठ अभियंता लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. विशाल बागुल (32) असे अटक करण्यात आलेल्या अभियंताचे नाव आहे. या घटनेनंतर महावितरण विभागातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे.

अलिबाग तालुक्यातील वरसोली येथे तक्रारदार यांचे लॅजिंग आहे. तक्रारदार यांनी लॉजिंगसाठी घरगुती वीज मीटर वरून वीज घेतली होती. लॉजिंगसाठी व्यवसायिक वीज मीटर घेतले नसल्याने महावितरणने तक्रारदार याना 2 लाख 47 हजाराचे दंड आकारणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी अलिबाग महावितरण कार्यालयाशी संपर्क साधला.

महावितरणचे कनिष्ठ अभियंता विशाल बागुल यांच्याकडे वरसोलीचा पदभार असल्याने तक्रारदार यांनी बागुल यांची भेट घेतली. त्यावेळी वीज बिल कमी करण्यासाठी बागुल यांनी तक्रारदार यांच्याकडे 1 लाख 20 हजाराची लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी रायगड लाच लुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारदार यांनी केलेल्या तक्रारीनुसार लाच लुचपत विभागाने सापळा रचत अलिबाग चेंढरे येथील कार्यालयात लाचेचा पहिला पन्नास हजाराचा हफ्ता स्वीकारताना बागुल यांना रंगेहाथ पकडले.

आपली प्रतिक्रिया द्या