अलिबागचा निनाद जाधव ठरला ‘रायगड श्री’ चा मानकरी

605

पेण नगरपरिषदेच्या मैदानावर भरलेल्या स्वररंगच्या पेण फेस्टिवलमध्ये झालेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत अलिबागचा निनाद जाधव ‘रायगड श्री 2019’ चा विजेता ठरला. तसेच अक्षय खोत याने बेस्ट पोजरचे पारितोषिक पटकावले आहे.

स्वररंग पेण तर्फे रायगड डिस्ट्रीक बॉडीबिल्डर्स फेडरेशनच्या मान्यतेने व प्रायोजक एस. आर. फिटनेस क्लब पेण यांच्या सौजन्याने या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत 55 किलो वजनी गटात सुमीत शेडगे, 60 किलो वजनी गटात महेंद्र पाटील, 65 किलो वजनी गटात जयेंद्र मयेकर, 70 किलो वजनी गटात अक्षय खोत व खुल्या गटात निनाद जाधव या स्पर्धकांनी प्रथम क्रमांक पटकावला. व या गटात विजेत्यांमध्ये झालेल्या अंतिम स्पर्धेत ‘रायगड श्री 2019’ चा विजेता निनाद जाधव तर बेस्ट पोजरचे अक्षय खोत हा मानकरी ठरला.

आपली प्रतिक्रिया द्या