
महाराष्ट्र राज्य अॅथलेटिक्स असोसिएशन व रायगड जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धा रविवारी अलिबाग येथे पार पडली. वेगवेगळ्या गटात झालेल्या या स्पर्धेत 31 जिल्ह्यातील 552 धावपटू सहभागी झाले होते. 10 किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत पुरुषांच्या गटात पुण्याच्या दादासाहेब वैभट याने बाजी मारली. तर महिलांमध्ये साताऱ्याच्या जनाबाई हिरवे हिने अजिंक्यपद पटकावले. पुरुष गटात नाशिक तर महिला गटात सातारा संघाला सांघिक विजेतेपद मिळाले. या स्पर्धेतून तेलंगणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी राज्याचा संघ निवडला जाणार आहे. सहा किलोमीटर स्पर्धेत रायगड उरण जिमखान्याची ऋतुजा सकपाळ ही तिसरी आली आहे.
महाराष्ट्र राज्य क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून ऑलम्पिक खेळाडू आनंद मीनाझिस हे उपस्थित होते. अलिबाग उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम, खजिनदार राजू प्याती, सचिव ठाणे अशोक आयर, दीपक लोंढे, बाब्दीत डिसुझा, दिनेश भालेराव, प्रवीण फुटाणकर, हे बक्षीस समारंभ वेळी उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देण्यात आले.
































































