
उत्तर प्रदेशातील योगी सरकारने नाव बदलण्याचा ट्रेंड कायम ठेवला आहे. उत्तर प्रदेशातील बहुचर्चित अलिगड शहराचे नाव आता बदलण्यात येणार असून ते आता हरिगड या नावाने ओळखले जाणार आहे. अलिगड शहराचे नाव बदलण्यास अलिगड महापालिकेने एकमताने मंजुरी दिली आहे.
महापौर प्रशांत सिंघल यांनी मंगळवारी बैठकीत नामकरणाचा प्रस्ताव सादर केला. याला सर्व नगरसेवकांनी अनुमोदन दिले. उत्तर प्रदेश सरकारने या नावाला हिरवा पंदील दर्शवल्यास अलिगडचे नाव हरिगड होईल. नामकरणाचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविला जाईल. प्रशासन याची दखल घेत अलिगडचे नाव हरिगड करेल, असे महापौर प्रशांत सिंघल यांनी म्हटले आहे.






















































