
सामना प्रतिनिधी । वसई
डीजेचा आवाज… रेन डान्स… आणि थरारक राईड्स… सोबतीला ‘स्टॉक’… गटारी सेलिब्रेशनसाठी हॉट स्पॉट ठरलेल्या वसईतील रिसॉर्ट शनिवारपासूनच हाऊसफुल्ल झाले आहेत. सुमारे लाखभर पर्यटक वसईत गटारी साजरी करण्यासाठी दाखल झाले असून अनेक रिसॉर्ट, हॉटेल्समध्ये गर्दी उसळली आहे.
अर्नाळा, कळंब, नकापूर, राजोडी आदी ठिकाणी 35 मोठे रिसॉर्ट आहेत. तसेच 200 हून अधिक लहान रिसॉर्ट आहेत. स्विमिंग पूल, रेन डान्सची सोय असणाऱ्या रिसॉर्टला पर्यटक सर्वाधिक पसंती देत असल्याने 50 हून अधिक रिसॉर्टवर गर्दी झाली आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवला असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी सांगितले.

























































