ऑल द बेस्ट! बारावीची आजपासून परीक्षा

355

बारावीची परीक्षा उद्या 18 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. महिनाभर म्हणजेच 18 मार्चपर्यंत परीक्षा सुरू राहणार आहे. राज्यभरातील 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.

परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी अर्धा तास आधीच (म्हणजेच सकाळ सत्रात 10.30 वाजता आणि दुपार सत्रात 2.30 वाजता) परीक्षा केंद्रांवर पोहोचणे आवश्यक आहे. तसेच यंदा प्रथमच सायन्स शाखेच्या फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि गणित-संख्याशास्त्र विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा आराखडा बदलण्यात आला आहे. परीक्षेसंदर्भात काही अडचणी असल्यास मुंबई विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांनी 022-27881075, 27893756 या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधायचा आहे.

शाखानिहाय परीक्षेला बसलेले राज्यातील विद्यार्थी

  • सायन्स – 5,85, 736
  • आर्ट्स – 4,75,134
  • कॉमर्स – 3,86,784
  • व्होकेशनल – 57, 373
आपली प्रतिक्रिया द्या