२ डिसेंबरपर्यंत युती टिकवायची, रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याने महायुतीत भूकंप

महायुतीत मिंधे गट आणि भाजपमध्ये नाराजी नाट्य असताना २ डिसेंबरनंतर मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. यातच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महायुतीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याचं राजकरण चांगलंच तापलं आहे.

आज नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने रवींद्र चव्हाण जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडीवर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, “मला २ तारखेपर्यंत युती टिकवायची आहे.” यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात २ डिसेंबरनंतर महायुतीत मोठा भूकंप होणार का? अशी चर्चा रंगली आहे.