
गेल्या 36 तासात अमरावती जिल्ह्यात कोरोनामुळे22 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतकाची संख्या 191 वर पोहचली आहे. तर आज दुपारपर्यंत आलेल्या अहवालात कोरोनाची पुन्हा 104 नवे रुग्ण आढळुन आल्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 8097 वर पोहचली आहे.
10 तारखेला 12 तर 11 तारखेला 10 कोरोनाबाधितांचा जिल्ह्यात मृत्यू झाला. त्यामुळे आता कोरोनाचा बाधित रुग्ण दगावल्याचे प्रमाण वाढले आहे. यासोबतच कोरोना बाधितांची संख्या दररोज 200 च्या वरच गेली आहे. अशा स्थितीत अमरावती जिल्ह्यात कोरोनाची स्थिती चिंताजनक झालेली आहे. आज आढळुन आलेल्या 104 रुग्णांपैकी 36 रुग्ण ग्रामीण भागातील आहे. तर इतर रुग्ण अमरावती शहराच्या वेगवेगळ्या भागातील आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रकोप वाढल्याचे चित्र आहे. अचलपूर-परतवाड्याचे 5 तर दर्यापूर येथे 5, नांदगाव खंडेश्वर येथे 2 तसेच भातकुली,चांदूरबाजार, नांदगाव खंडेश्वर व वरुड तालुक्यात सुध्दा कोरोनाबाधित रुग्ण आढळुन येत आहे.
सध्या अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 1419 रुग्णावर उपचार सुरु आहे. नागपूर येथील 15 रुग्ण भर्ती आहे. तर 333 रुग्ण गृह विलगीकरणात आहे. कोरोनामुळे बरे झाल्याची संख्या 6035 आहे. एकंदरीतच गेल्या दोन दिवसापासून कोरोना मृत्यूचे प्रमाण वाढत असून आज रात्री पर्यंत नेमके किती रुग्ण दगावले याची आकडेवारी अद्यापपर्यंत प्राप्त झाली नव्हती. मात्र येथील दयासागर हॉस्पिटलमध्ये एक पोलीस कर्मचार्याला कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. इतर मृतकांची माहिती प्राप्त होऊ शकली नाही.





























































