
अमरावती जिल्ह्यासोबतच पश्चिम विदर्भात कोरोनाग्रस्ताचा कहरच सुरु झाल्याचे चित्र दिसून येत आहे. अमरावती जिल्ह्यात गेल्या २४ तासात नवे ४४ कोरोनाग्रस्त आढळुन आले. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ७३३ वर पोहचली आहे. यासोबतच पश्चिम विदर्भाचे अमरावतीसह, अकोला, यवतमाळ व बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाग्रस्त आढळुन आले आहे. तर पश्चिम विदर्भाच्या वाशिम जिल्ह्यात एकही कोरोनाग्रस्त आढळुन आला नाही. ही बाब त्या जिल्ह्यापुरती आशादायी आहे.
अमरावती जिल्ह्यात काल रात्री आलेल्या अहवालात एकुण १४ रुग्ण कोरोनाग्रस्त आढळुन आले. तर आज सकाळी आलेल्या अहवालात पुन्हा नवे १० रुग्ण कोविड रुग्णालयात भर्ती करण्यात आले आहे. आज दाखल झालेल्या रुग्ण अचलपुर, धामणगाव रेल्वे व अचलपूर येथे नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबतच अमरावती जिल्हा परिषद कार्यालयात ४२ वर्षीय पुरुष, मैलापुरा अमरावती येथील ५८ वर्षीय महिला व २६ वर्षीय महिला, गाडगेनगर पाण्याच्या टाकीजवळ ३५ वर्षीय महिला तर शेगाव नाका येथील ४२ वर्षीय पुरुष कोरोनाग्रस्त आढळुन आला आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात असलेल्या अचलपूर येथे बुंदेलपुरा येथे २९ वर्षीय पुरुष, धामणगाव रेल्वे येथील कॉरंटाईन सेंटरमधील २८ वर्षीय पुरुष याच ठिकाणी ३५ वर्षीय महिला व ८ वर्षाच्या बालकाचा तसेच खोलापुरी गेट ४६ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात इतर जिल्ह्याची माहिती घेतली असता काल रात्रीपर्यंत बुलढाणा जिल्ह्यात ४३, अकोला जिल्ह्यात ३७, यवतमाळ जिल्ह्यात १७ रुग्ण कोरोनाग्रस्त आढळुन आले आहे. अलीकडच्या आठ दिवसाचा कालावधी लक्षात घेता अनलॉकनंतर कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्हा जिल्हाधिकार्यांनी चक्क कडक संचारबंदी लावण्याचा निर्णय घेतला आहे.






























































