
अमरावतीत गेल्या 24 तासात 76 नवे कोरोनाग्रस्त आढळुन आले आहेत. या अमरावती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या 8 कैद्यांचा समावेश असून इतर कोरोनाबाधित वेगवेगळ्या तालुक्यातील आहेत. तिवसा तालुक्यात असलेल्या तळेगाव ठाकूर येथील 3, मोझरी येथे 3 तर शेंदोंळा बुजुर्ग येथे सुद्धा 1 रुग्ण कोरोनाबाधित आहे. दर्यापूर तालुक्यातील 5 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळुन आले आहे. यात येवदा येथील 2 सामगा येथील 1, कमळापूर येथील 1 तर दर्यापूर ग्रामीण मधून 1 महिला कोरोनाबाधित आहे. जिल्ह्याच्या इतर तालुक्यात मोझरी, चांदूरबाजार येथील कोरोनाबाधित आढळुन आले. या व्यतिरिक्त अमरावती शहरातील वेगवेगळ्या नगरात कोरोनाबाधित आढळुन आले असून बडनेरा येथे सुध्दा कोरोनाबाधित आहे. अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे 95 जणांचा मृत्यू झाला असून सध्या 1175 रुग्ण कोरोनाग्रस्त आहे. 2496 रुग्णांची कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात कोरोना बाधिताची एकुण संख्या 3842 आहे.





























































