अमरावती – इंडिकाची दुचाकीला धडक; 3 ठार

अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार मार्गावर असलेल्या मधापुरीच्या वळणरस्त्यावर मोटरसायकल व इंडीका गाडीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत 3 मोटरसायकल स्वारांचा जागीच मृत्यू झाला.

चिमाजी अमृत कोकरे (वय 50,रा.अंबाडा), सुभाजी कोंडी कास्देकर (वय 55, रा.मानी, ता.आटनेर) व रामभाऊ रामू परते (वय 45, रा.नळा, ता.आटनेर) हे तिघे 15 जुलै रोजी रात्री 9.30च्या सुमारास आपले काम आटपूर अंबाडा येथे जाण्यासाठी मोटरसायकलने जात असताना विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या इंडिका गाडीच्या चालकाने या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. यात तिघेही मोटरसायकलवरून खाली फेकल्या गेले. ही धडक इतकी जबरदस्त होती की यातील एका मृतक इसमाचा पाय पूर्णपणे तुटून पडला. घटनेत तिघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मोर्शी पोलिसांनी घटनास्थळ गाठून 3 मृतकांचे शव उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे आणले. 16 जुलै रोजी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी इंडिका चालक मोहन गुडीयाविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या