अमरावती येथील लाचखोर पोलीस उपनिरीक्षक पोलिसांच्या जाळ्यात

police

दोन लाखाची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने गाडगे नगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश अहिरे यांना ताब्यात घेतले असून या प्रकरणात मध्यस्थी करणाऱ्या पप्पु रावलानी नामक दलालासुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई शनिवारी सायंकाळी अमरावती नागपूर महामार्गावर असलेल्या व्हाईट कॅसल समोर करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार हा दारूचा व्यावसायिक असून त्याच्याजवळची दारू लॉकडाऊनदरम्यान 4 ऑगस्ट रोजी गाडगेनगर पोलिसांनी पकडली होती. सदर दारू ही बनावट असल्याचे सांगून पोलिसांनी त्याला सोडून द्यायचे असल्यास 2 लाखांची मागणी केली होती.

ही तडजोड रामपुरी कॅम्पमध्ये राहणाऱ्या पप्पु रावलानी याने करून 1 लाखावर प्रकरण निपटून देण्याचे ठरले. त्यानुसार काल सायंकाळी रावलानी यांनी 1 लाख स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने त्यांना ताब्यात घेतले. त्या चौकशीत ही रक्कम उपनिरीक्षक अहिरे यांनी मागितल्याची सांगितले. त्यानुसार अहिरे व पप्पु रावलानी यांच्या विरोधात गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या