
ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत समावेश असलेले जेफ बेजोस लग्नबंधनात अडकले आहेत. 61 वर्षीय जेफ बेजोस यांनी 55 वर्षीय प्रेयसी लॉरेन सांचेझसोबत शुक्रवारी इटलीमध्ये लग्नगाठ बांधली. हा लग्नसोहळा तीन दिवस चालला होता. या सोहळ्याला 200 हून अधिक व्हीआयपी पाहुणे उपस्थित होते. लॉरेन सांचेझ यांनी लग्नाचा फोटोही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.
इटलीतील व्हेनिस येथे जेफ बेजोस आणि पत्रकार लॉरेन सांचेझ यांचा शाही विवाह सोहळा पार पडला. लग्न सोहळण्यात लॉरेन हिने पांढराय रंगाचा गाऊन घातला होता, तर जेफ बेजोस यांनी क्लासिक सूट घातला होता.
View this post on Instagram
सॅन जॉर्जिओ मॅगिओरच्या बेटावर हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. पाहुण्यांना येथे आणण्यासाठी विशेष विमानं आणि मोटार बोटींची व्यवस्था करण्यात आली होती.

या राजेशाही लग्नाला उद्योग, राजकारण, सिनेसृष्टी, क्रीडा जगतातील हाय प्रोफाईल लोक उपस्थित होते. अभिनेत्री किम कार्दशियन, क्लॉई कार्दशियन, ओपरा विन्फ्रे, ऑरलँडो ब्लूम, ओप्रा विन्फ्रे, बॅरी डिलर, लिओनार्डो डिकॅप्रियो यांच्यासह फुटबॉल खेळाडू टॉम ब्रँडी, फॅशन डिझायनर स्पेन्सर अँटल, गायक अशर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवांका आणि तिचे पती जेरेड कुशनर उपस्थित होते.

हे जगातील सर्वात महाग लग्न होते. या लग्नासाठी 427 कोटी रुपये खर्च करण्यात आले. तसेच कोट्यवधी रुपयांचे दानही करण्यात आले.



























































