
अनेकवेळा आपण स्मार्ट टीव्ही घेतो. स्मार्ट टीव्हीमध्ये आपल्याला ओटीटी प्लॅटफॉर्मचा आस्वाद घेता येतो. आपला टीव्ही स्मार्ट नसल्याने अनेकजण ऍमेझॉन फायर टीव्ही स्टिक किंवा इतर उपकरणांचा वापर करून ओटीटी प्लॅटफॉर्म वापरतात.
पण ऍमेझॉनने आता एक भन्नाट टीव्ही लाँच केला आहे. हा टीव्ही स्मार्ट असून त्यात इनबिल्ट फायर टीव्ही स्टीकचे फीचर आहेत.
या टीव्हीची किंमत 27 हजार रुपये असून ग्राहकांना अर्ध्या किंमतीत हा टीव्ही मिळणार आहे.
जबरदस्त फीचर
या टीव्हीमध्ये इनबिल्ट फायर टीव्ही स्टिक आहे. त्यामुळे तुम्हाला वेगळे फायर टीव्ही स्टिक घेण्याची गरज नाही. तसेच वेगळा रीमोटही येणार नसल्याने हा टीव्ही अजून युजर फ्रेंडली होणार आहे. या टीव्हीमध्ये तुम्ही सगळे ऍप्स डाऊनलोड करून त्याचा आस्वाद घेऊ शकता. फक्त ज्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कार्यक्रम तुम्हाला पहायचे असतील त्याचे तुम्हाला सबस्क्रिप्शन घेणे गरजेचे आहे.
या टीव्हीची साईज 32 इंच आहे. जर तुम्हाला यावरून मोठा टीव्ही हवा असेल तर तोही ऍमेझॉनवर उपलब्ध आहे. ऍमेझॉनचा 43 इंचाचा टीव्ही असून त्याची किंमत 44 हजार इतकी आहे. पण ऑफरमध्ये ग्राहकांना हा अर्ध्या किंमतीत म्हणजेच 23 हजार 499 रुपयांना उपलब्ध आहे.
य टीव्हीमध्ये Dolby digital sound, DTS Tru surround, ultra bright screen असे फीचर आहेत. अल्ट्रा ब्राईट स्क्रीनमुळे तुम्ही स्क्रीन वाकडी धरली तरी स्क्रीनवरील चित्र स्पष्ट दिसणार आहे.
युजर फ्रेंडली रिमोट
या टीव्हीच्या रीमोटमध्ये नेटफ्लिक्स आणि ऍमेझॉन प्राईमसाठी वेगळी बटण आहेत. एक बटन दाबल्यास तुम्ही नेटफ्लिस किंवा ऍमेझॉन प्राईम सुरू करू शकता. तसेच त्यात ऍलेक्सा कमांडचाही समावेश आहे. ऍलेक्सा कमांडवरून तुम्ही
ऍलेक्साला आदेश देऊन हवा तो कार्यक्रम सुरू करू शकता. इतकेच नाही तर तुमच्याकडे स्मार्ट होम सिस्टम असेल तर ती ऍलेक्साशी कनेक्ट करून तुम्ही घरातली यंत्रे चालवू शकता.
लाइव्ह टीव्ही
अनेकवेळा आपल्याकडे DTH किंवा केबल असते. या टीव्हीमध्ये केबल आणि लाईव्ह टीव्हीचीही सोय आहे. केबल लावून किंवा लाईव्ह टीव्हीला कनेक्ट करून तुम्ही नेहमीसारखा टीव्हा पाहू शकता.




























































