
जगभरातील प्रसिद्ध आयटी कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा सिलसिला सुरूच ठेवला आहे. आता अॅमेझॉनने आपल्या ऑडियो बिझनेच्या वंडरी पॉडकास्ट विभागातील 110 कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कामावरून काढून टाकले आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांसोबत वंडरीचे सीईओ यांनाही घरचा रस्ता दाखवला आहे. कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात अॅमेझॉनचे ऑडियो, ट्विच आणि गेम्सचे उपाध्यक्ष स्टिव्ह बूम यांनी सांगितले की, डॉ. डेथ अमेरिकन स्कँडल व बिझनेस वॉर्स यासारख्या नेरेटिव्ह आणि स्टोरी बेस्ड पॉडकास्ट सीरिजला आता अॅमेझॉनच्या ऑडियो बुक सर्व्हिस ऑडिबलअंतर्गत मॅनेज केले जाईल.
कंपनी आता क्रिएटरलेडेड, व्हिडीओ बेस्ड कंटेट वाढवत आहे. काही पॉडकास्टला बनवण्याची जबाबदारी वंडरी ब्रँडची असेल. अॅमेझॉनच्या म्हणण्यानुसार, हा बदल पॉडकास्ट कंजप्शनने प्रेरित आहे. व्हिडीओ स्टाईल, पर्सनाल्टिजचे शो यूट्यूब आणि स्पॉटिफायवर जास्त लोकप्रिय होत आहेत.
ओळख पुसणार नाही
110 कर्मचारी कपातीनंतर कंपनीकडून यासंबंधी स्पष्टीकरण आले आहे. ज्या कर्मचाऱ्यांना वंडरी पॉडकास्ट विभागातून काढून टाकले आहे, त्यातील काही कर्मचाऱ्यांना कंपनीच्या अन्य विभागांत काम दिले आहे. कंपनीने हे बदल केले असले तरी वंडरीच्या रूपात ब्रँडची ओळख पुसणार नाही. ती तशीच कायम राहणार आहे. तसेच वंडरी अॅपही सुरूच राहणार आहे, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.