
ऑनलाइन शॉपिंगवाल्यांची सध्या चलती असून या क्षेत्रातील बडय़ा कंपनीने मध्य रेल्वेशी करार केला असून या कंपन्यांच्या पार्सलसाठी मध्य रेल्वेच्या स्थानकांवर पिकअप पॉईंट तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेच्या महसुलात मोठी भर पडणार आहे. मध्य रेल्वेने ऍमेझॉन कंपनीशी करार केला असून ऑनलाइन शॉपिंग क्षेत्रात अग्रेसर असलेल्या या कंपनीच्या पार्सलना पिकअप पॉईंट मध्य रेल्वे उपलब्ध करून देणार आहे. मध्य रेल्वेने तीन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर ऍमेझॉन कंपनीशी हा करार केला आहे. या करारात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे, कल्याण स्थानकांवर पिकअप पॉइंट उभारण्यात येणार असून तेथून ग्राहक आता आपले पार्सल कलेक्ट करू शकणार आहेत. त्यासाठी मध्य रेल्वेला 6 लाख रुपयांचा महसूल मिळणार आहे.

























































