जलसंवर्धनासाठी पुढाकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऍमेझॉन वेब सर्व्हिसेस वॉटर डॉट ओआरजी आणि वॉटर एड या एनजीओच्या सहकार्याने तिच्या सामुदायिक जल प्रकल्पांच्या माध्यमातून 2020 पासून आतापर्यंत महाराष्ट्रसह तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील 25 हजारांहून अधिक नागरिकांना स्वच्छ पाणी उपलब्ध करून दिले आहे. आता एडब्ल्यूएसची वॉटर डॉट ओआरजी, वॉटर एड आणि इतर एनजीओच्या मदतीने देशात पाण्याशी संबंधित इतर विषयांचा तिच्या उपक्रमांमध्ये समावेशाची योजना आहे. महाराष्ट्रात वॉटर डॉट ओआरजीने माविम अर्थात ‘महिला आर्थिक विकास महामंडळा’सोबत पाणीपुरवठा आणि स्वच्छता कर्ज उत्पादनाचे विपणन करण्यासाठी काम करते.