‘मेक इन इंडिया’ला ऍमेझॉनचे पाठबळ, 10 अब्ज डॉलर्सची हिंदुस्थानी उत्पादनांची निर्यात करणार

621
amazon-boss-jeff-bezos

केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या ‘मेक इन इंडिया’ला ऍमेझॉन या जगप्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनीचे पाठबळ मिळणार आहे. ऍमेझॉनने हिंदुस्थानातील उत्पादकांना जागतिक बाजारपेठेची द्वारे खुली करतानाच पुढील पाच वर्षांत 10 अब्ज डॉलरची हिंदुस्थानी वस्तूंची निर्यात करण्याची ग्काही खुद्द ऍमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझॉस यांनी दिली.

जेफ बेझॉस सध्या हिंदुस्थानच्या दौऱयावर असून बुधवारी त्यांनी दिल्लीत लघुउद्योजकांच्या परिषदेला संबोधित केले. त्यांनी उद्योजकांना मार्गदर्शन करतानाच हिंदुस्थानातील गुंतवणुकीसंदर्भात घोषणाही केल्या. हिंदुस्थानात ई-कॉमर्सची बाजारपेठ झपाटय़ाने काढली आहे. यातील वृद्धी आणि व्यावसायिक संधी लक्षात घेत ऍमेझॉन हिंदुस्थानात एक अब्ज डॉलरची गुंतकणूक करणार आहे. ही गुंतकणूक लघु आणि मध्यम उद्योजकांना डिजिटल उपकरणांनी सुसज्ज करण्यासाठी वापरली जाणार असल्याचे बेझॉस यांनी सांगितले.

जेफ बेझॉस यांच्या विरोधात निदर्शने
कॉन्फेडेरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स संघटनेच्या व्यापाऱयांनी दिल्ली व अन्य काही शहरांत जेफ बेझॉस यांना विरोध करीत निदर्शने केली. ऍमेझॉनच्या जास्त डिस्काऊंट देण्याच्या धोरणाचा फटका आपल्या व्यवसायाला बसल्याचे व्यापाऱयांचे म्हणणे आहे. बेझॉस यांना भेटण्यापूर्वी आमच्या मुद्दय़ांचा विचार करावा, असे पत्र व्यापाऱयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या