आंबा घाटात दरड हटवली;वाहतूक सुरु

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईसह कोकणात देखील पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या 24 तासात रत्नागिरीत सरासरी 87 मिमी पावसाची नोंद झाली. शनिवारी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

शुक्रवारी दुपारी आंबा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली.जेसीबीच्या सहाय्याने आंबा घाटातील रस्त्यावर आलेली दरड हटविण्यात आली असून आता वाहतूक पुर्ववत करण्यात आली आहे. गणपती आगमनापासून सुरु झालेला संततधार पाऊस सुरुच आहे.  आजही जिल्ह्यात पावसाचा कहर सुरुच आहे.आज भरपावसात गौरीगणपती विसर्जन करावे लागणार आहे. अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.