आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ साहित्यिक प्रा. सतेश्वर मोरे यांचे निधन

poet

प्रा. सतेश्वर मोरे यांचे काल सायंकाळी नागपूर येथील न्यूक्लियस रुग्णालयात निधन झाले. गेल्या तीन-चार दिवसांपासून ते कोरोना या आजाराशी लढत होते. महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी, लेखक, समिक्षक व विचारवंत अशा विविध क्षेत्रात त्यांचा नाव लौकिक होता.

15 जूलै 1962 त्यांचा जन्म झाला होता. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर ते वलगाव येथील आपल्या मामाकडे आले. तेथून त्यांनी आपले पुढचे शिक्षण पूर्ण केले. विद्यार्थी दशेत असतानाच कविता, नाट्य व वादविवाद या स्पर्धेतून ते नावारुपास आले व पुढेल त्यांनी एम.ए. केल्यानंतर बडनेरा येथील आरडीआयके महाविद्यालयात ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना ते पँथर या सामाजिक संघटनेत सहभागी झाले. तेथूनच त्यांच्यामध्ये विद्रोही कवी नावरुपास आला. पुढे संबोधी, डॉ. आंबेडकर स्टडी सर्कलशी जुळल्यानंतर अमरावतीमधील साहित्य व सांस्कृतिक चळवळीला त्यांचे मोठे योगदान लाभले.

‘आंबेडकरी साहित्य’ या नावाने संपूर्ण महाराष्ट्रभर साहित्याची संकल्पना रुजविली. अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलने घेऊन आंबेडकरी साहित्य चळवळ उभी केली. त्यांच्या निधनाने आंबेडकरी साहित्य चळवळीत पोकळी निर्माण झाली आहे.

28 फेब्रुवारी रोजी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात नेले असता त्यांची रक्तातील ऑक्सिजनची मात्रा कमी आढळल्याने आणि कोरोनाची इन्फेक्शन लेव्हल जास्त असल्या कारणाने त्यांना नागपूर येथील न्यूक्लियस रुग्णालयात पाठविण्यात आले.

तेथे तीन दिवसांपासून ते कोरोनाशी झगडत होते. आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. प्रा. सतेश्वर यांचे निधन नागपूर येथे झाले. त्यामुळे कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक नियमावलीनुसार कोरोना बाधित मृत व्यक्तीचा अंतिम संस्कार जेथे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला त्याच जिल्ह्यात करण्यात येतो. परिणामी प्रा. सतेश्वर यांचे पार्थिव अमरावतीला आणले जाणार नाही. नागपुरातच त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येतील. प्रा. सतेश्वर मोरे यांनी अनेक वर्षे जन्माध्यम साङ्गी रविवारच्या पुरवणीचे कार्य अतिथी संपादक म्हणून पाहिले आणि त्या काळात जनमाध्यमचे आंबेडकरी चळवळीशी, अनेक खातनाम लेखक आणि कविंशी ऋणानूबंध भक्कम कह्वन दिले. दैनिक जनमाध्यमच्या आंबेडकरी विशेषांक किंवा अंबादेवी मंदिरातील प्रवेशाचा भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या जीवनातील प्रसंग याला अग्रस्थान देऊन तो कित्येकांच्या निदर्शनास आणला. त्यांच्या अकाली निघून जाण्याने अमरावतीच्या साहित्य क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या