Video – निवडणूकीच्या आधी जनजागृतीसाठी कलाकारांनी उतरवले कपडे, शेअर केला न्यूड व्हिडीओ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीचे बिगूल वाजले आहे. दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. मात्र या निवडणूकीच्या आधी मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी काही हॉलिवूड सेलिब्रिटिंनी नेकेड व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी त्यांनी मतदानाचे महत्त्व पटवून दिले आहेत.

अमेरिकेतील पेनेस्लेवानिया राज्यात यंदा पोस्टाने मतदान करण्याची परवानगी दिली आहे. मात्र मतदानाचे बेलोट पेपर एनव्होलोपमध्ये व्यवस्थित पॅक करून पोस्ट करायचे आहे. ज्यांच्ये एनव्होलप व्यवस्थित पॅक केलेले नसेल त्यांचे मत रद्द करण्यात येईल असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. अशा मताला नेकेड मत म्हणतात. असे मत वाया जाऊ नये म्हणून सेलिब्रिटींनी नेकेड होत या मताचे महत्त्व पटवून दिले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली होती. याबाबत बोलताना त्यांनी म्हटलंय की ‘देवकृपेने अचानक कोरोनाची लागण झाली.’ कोरोना झाल्याने या आजारावरच्या प्रयोगात्मक उपचारांना आपल्याला सामोरे जाता आले असं त्यांनी म्हटलंय. बुधवारी त्यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला असून यामध्ये त्यांनी हे उपचार लवकरच सगळ्या अमेरिकी नागरिकांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगितले. अवघ्या दोन दिवसांपूर्वी ट्रम्प यांना वॉल्टर रीड सैन्य रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं होतं. मात्र त्यांना झालेली कोरोनाची लागण पूर्णपणे दूर झाली आहे अथवा नाही हे मात्र कळू शकलेलं नाहीये. अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्ष पदासाठीची निवडणूक होत आहे. ट्रम्प कोरोनाग्रस्त झाल्याने ते प्रचारात थोडे मागे पडले आहेत