गृहमंत्री अमित शहा यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह, पण डिस्चार्ज नाही

681
amit-shah

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. 2 ऑगस्ट रोजी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. शहा यांच्यावर गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

शहा यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. असे असले तरी त्यांना डिस्चार्ज दिला गेला नाहीये. शहा यांच्यावर उपचार सुरू आहेत. शहा यांची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल. 2 ऑगस्ट रोजी अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर शहा यांच्या संपर्कात आलेल्यांन क्वारंटाईन केले होते. केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी स्वतःला होम क्वारंटाईन केले होते.

केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांना कोरोनाची लागण 

पापड खा कोरोना पळवा असे आवाहन करणारे केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल यांना कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी सायंकाळी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. राजस्थानच्या बिकानेर लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आलेले मेघवाल यांच्याकडे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री आहेत.

मेघवाल यांच्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा,  त्यांची कन्या,  माजी मुख्यमंत्री सिद्धरामैया, उत्तर प्रदेश भाजप अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह, तमिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. स्वतंत्र देव सिंह घरीच क्वारंटाईन असून अन्य नेत्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 64 हजार 399 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील एकूण रुग्णांची संख्या 21 लाख 53 हजार 11 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 14 लाख 80 हजार 885 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या 6 लाख 28 हजार 747 आहे. गेल्या 24 तासात 861 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा 43 हजार 379 रुग्णांवर पोहोचला आहे.

देशात सर्वाधिक राज्यात सध्या 1 लाख 47 हजार 355 सक्रिय रुग्णांची संख्या आहे. गेल्या 24 तासात 7 लाख 19 हजार 364 कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत देशात 2 कोटी 41 लाख कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या