
अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू असून, 1 जानेवारी 2024 ला मंदिर पूर्ण होईल. त्यामुळे पुढील वर्षापासून भाविकांना दर्शनासाठी हे मंदिर खुले होणार आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली.
तीन टप्प्यांत मंदिर निर्माण
मंदिराचे तीन टप्प्यांत निर्माण होत आहे. पहिला टप्पा 30 डिसेंबर 2023 ला पूर्ण होईल. त्यात मंदिर गाभाऱयासह 5 मंडप असतील. 2024 ला मकरसंक्रात दिनी प्रभू श्रीराम तेथे विराजमान होतील. भाविकांना 19 फूट अंतरावरून प्रभू श्रीरामांचे दर्शन घेता येईल.
मंदिराचा दुसरा टप्पा 30 डिसेंबर 2024 ला पूर्ण होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. यात दुसरा आणि तिसरा मजला पूर्ण होईल.
मंदिराचा तिसरा टप्पा 30 डिसेंबर 2025 ला पूर्ण होईल.




























































