
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 15 नोव्हेंबरपासून दोन दिवसांच्या पुणे दौऱयावर येणार आहेत. या दौऱयात ते दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासह विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. शहा हे मुंढवा येथील पॅम्पसला भेट देणार असून पंपनीच्या 60 वर्षांच्या वाटचालीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांच्या हस्ते स्मृतीफलकाचे अनावरण करण्यात येणार आहे.
कंगनाविरोधात गुन्हा दाखल
सोशल मीडियावरून गांधी पुटुंबावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याच्या आरोपाखाली हिमाचल प्रदेश पोलिसांनी भाजपच्या खासदार कंगना राणावतविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शिमल्यातील बालुगंज पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कंगनाच्या पोस्टमध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि दिशाभूल करणारी विधाने केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ब्रिटनमध्ये तीन पाकिस्तानी दोषी
ब्रिटनमध्ये 2008 ते 2010 मध्ये एका 13 वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली तीन पाकिस्तानी नागरिकांना कोर्टाने दोषी ठरवले आहे. यातील दोन आरोपी खटला सुरू होण्याआधीच पाकिस्तानात पळून गेले आहेत. मुदस्सर हुसैन, गजनफर हुसैन आणि कामीर इफजल खान असे या तीन आरोपींची नावे आहेत. शेफील्ड क्राऊन कोर्टाने तिन्ही आरोपींना वेगवेगळ्या गुह्याखाली दोषी ठरवले. ब्रिटनच्या नॅशनल क्राइम एजन्सीने दोन्ही फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे.




























































