
भाजपला निवडून द्या, इथली बेरोजगारी 40 टक्क्यांनी कमी करू असे आवाहन अमित शहांनी पुद्दुचेरीच्या मतदारांना केले आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा आज पुदुच्चेरीच्या दौर्यावर आहेत तेव्हा ते बोलत होते. तसेच पुद्दुचेरीत काँग्रेसने तुच्छ राजकारण केले अशी टीकाही त्यांनी केली.
शहा म्हणाले की पुद्दुचेरीत एनडीएचेच सरकार स्थापन होणार आहे. फक्त पुद्दुचेरीतच नाही तर संपूर्ण देशात काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये सामील होत आहेत. कारण काँग्रेसमध्ये कुठल्याही व्यक्तीची पारख केली जात नाही. पुद्दुचेरीत भाजपला मत द्या आम्ही बेरोजगारी 40 टक्क्यांनी कमी करू असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
पुद्दुचेरीत 30 विधानसभा जागा असून 6 एप्रिल रोजी एका टप्प्यात मतदान होणार आहे. यासाठी भाजप, काँग्रेस, द्रमुक आणि अण्णा द्रमुकने पूर्ण जोर लावला आहे.





























































