जे कुणीच करू शकलं नाही, ते कोरोनाने करून दाखवलं, बिग बींचा व्हिडीओ व्हायरल

2078

कोरोना नावाच्या राक्षसाने सध्या जगभर थैमान घातलं आहे. हजारो जीवांचा घास घेतलेल्या या रोगाचं सावट हिंदुस्थानावरही पडताना दिसत आहे. अशा भयग्रस्त वातावरणात सुरक्षित राहायला सांगत एक वेगळाच संदेश बिग बी अमिताभ बच्चन यांनी दिला आहे.

कोरोना व्हायरसवर आणि त्यासंबंधीच्या सुरक्षिततेच्या उपायांवरचा बिग बी यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओत अमिताभ यांनी कोरोनाला सूत्रदार म्हटलं आहे. कोरोनामुळे सगळं जग आता एक झालं आहे. जे काम एखाद्या तत्वज्ञ किंवा संगीतकार करू शकला नाही. ते काम कोरोनाने करून दाखवलं, असं बिग बी यांचं म्हणणं आहे. कोरोनाशी दोन हात करण्यासाठी सगळं जग भेदभाव विसरून एकत्र आलं आहे, असंही बिग बी म्हणाले आहेत.

बिग बींनी या काळात काय काळजी घ्यावी हेही सांगितलं आहे. हात आणि चेहरा धुणं, किल्ल्यांसारख्या नेहमी हाताळल्या जाणाऱ्या वस्तू साफ करणं, हस्तांदोलन न करणं अशा काही खबरदारीच्या उपायांनी आपण या व्हायरसशी लढू शकतो, असं बि बी म्हणाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या