बिग बी ऍक्शन मोडवर! लवकरच करणार केबीसीसाठी शूटिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेले चार महिने शूटिंगपासून दूर राहिलेले महानायक अमिताभ बच्चन आता लवकरच नव्या जोमाने शूटिंगला सुरूवात करणार आहेत. येत्या काही दिवसांत सर्व प्रकारच्या सुरक्षिततेची सर्क काळजी घेऊन ते ’कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय शोसाठी शूटिंग करणार आहेत. त्यांनीच आपल्या ब्लॉगवरून ही माहिती दिली आहे.

कोरोनावर मात केल्यानंतर महानायक अमिताभ बच्चन सध्या होम क्कारंटाईन असून आपल्या प्रकृतीची काळजी घेत आहेत. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर आता ते पुन्हा लवकरच कामाला सुरुवात करणार आहेत. येत्या काही दिवसांत ते कौन बनेगा करोडपतीच्या 12 व्या सीजनसाठी शूटिंग करणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने 65 वर्षांवरील कलाकारांना शूटिंगसाठी बंदी घालण्यात आली होती. ही बंदी नुकतीच उठण्यात आली आहे. त्यामुळे बिग बी यांचा शूटिंगचा मार्ग मोकळा झाला आहे. ब्लॉगमध्ये बिग बी म्हणाले, केबीसीच्या प्रोमोसाठी आणि केबीसीच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. जास्तीत जास्त काळजी आणि सुरक्षितता यावर भर असणार आहे.’