गरीब मराठी, श्रीमंत बच्चन! शूटिंगसाठी आणले स्वत:च्या वॉर्डरोबमधील कपडे

2240

सिनेमा कोणताही असो, बिग बजेट किंवा लो बजेट, बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन आजही त्यांच्या प्रत्येक भूमिकेसाठी जीव ओतून मेहनत घेतात. नवनवीन प्रयोग करत असतात. त्यामुळेच त्यांची प्रत्येक व्यक्तिरेखा संस्मरणीय ठरते. नव्या पिढीतील कलाकारांना यातून खूप शिकण्यासारखे आहे. लवकरच ‘एबी आणि सीडी’ या मराठी सिनेमातून बिग बी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यात त्यांच्यासोबत विक्रम गोखले यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ‘एबी आणि सीडी’चे निर्माते अक्षय बर्दापूरकर यांनी या चित्रपटाशी, विशेषतः बिग बींशी संबंधित एक अनोखा किस्सा सांगितला. त्यातून बच्चन यांच्या मनाची श्रीमंती दिसून येते. तसेच मराठीवरील त्यांचे प्रेमही दिसून येते.

मराठी चित्रपटांचे बजेट हिंदी चित्रपटांपेक्षा कमी असल्यामुळे बिग बी यांनी स्वतःच्या कपडय़ांची सोय स्वतःच करण्याचा निर्णय घेतला. अक्षय बर्दापूरकर म्हणाले की, चित्रपटातील त्यांच्या क्यक्तिरेखेसाठी अमिताभ यांनी निर्मात्यांकडे कपडे मागितले नाहीत. याउलट स्वतःच्या कपडय़ांची सोय स्वतःच केली. त्यांच्या कपडय़ांचे माप आम्हाला घ्यायचे होते. आम्ही त्यांना तसे सांगितले.  याकर ते म्हणाले की, याची तुम्ही चिंता करू नका. मी स्वतःच्या कॉर्डरोबमधूनच कपडे घेऊन येईन. यानंतर चित्रीकरणाच्या दिवशी ते पूर्ण व्हॅनिटी कॅन घेऊन आले. कॅनमधून त्यांनी 20 कपडे आणले होते. या कपडय़ांमधून कोणते हवेत ते आम्हाला त्यांनी निवडायला सांगितले.

 अक्षय म्हणाले की, अमिताभ बच्चन यांच्या या मदतीमुळे सिनेमाच्या बजेटला फार मदत झाली. मिलिंद लेले दिग्दर्शित ‘एबी आणि सीडी’ चित्रपट येत्या 13 मार्चला प्रदर्शित होत आहे.

रिटेक घ्यायलाही तयार

अक्षय पुढे म्हणाले की, अमिताभ यांची मराठी भाषेवर पकड चांगली आहे. पण असं असतानाही ते नेहमी दिग्दर्शकाला सीन योग्य झाला की नाही ते विचारायचे. प्रत्येक सीननंतर ते विचारायचे. एवढंच नाही तर त्यांना सीन योग्य वाटला नाही तर ते लगेच रीटेक घ्यायचे.

स्कतःच केलं चित्रपटाचं डबिंग

अक्षय बर्दापूरकर म्हणाले, अमिताभ यांना वाटलं असतं तर त्यांनी ‘एबी आणि सीडी’चे डबिंग दुसऱयाकडूनही करून घेतलं असतं. पण त्यांनी स्कतः चित्रपटाचे डबिंग केलं. फक्त डबिंगला वेळ देता यावा म्हणून त्यांनी सिनेमाचं चित्रीकरण नोव्हेंबरमध्येच पूर्ण केलं.

आपली प्रतिक्रिया द्या