मी चॅरिटी करतो, पण गाजावाजा करत नाही! बिग बी यांनी केली ट्रोलर्सची बोलती बंद

कोरोना काळात तुम्ही दानधर्म का करत नाहीत, असा सवाल विचारणाऱया ट्रोलर्सचा महानायक अमिताभ बच्चन यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. आपल्या चॅरिटीची लांबलचक यादीच ब्लॉगवर पोस्ट करत त्यांनी ट्रोलर्सची बोलती बंद केली आहे. ‘मी दानधर्म करतो, परंतु त्याचा गाजावाजा करायला मला आवडत नाही’, अशा शब्दांत त्यांनी ट्रोलर्सना सुनावले आहे.

कोरोनाच्या लढय़ात अनेक सेलिब्रेटी मैदानात उतरले आहेत. काही सेलिब्रेटी कसलाही गाजावाजा न करता मदतकार्य करतायत. त्यापैकीच एक म्हणजे अमिताभ बच्चन. मात्र बच्चन कुटूंबियांनी केलेल्या कामांची माहिती लोकांपर्यंत न पोहोचल्याने कोरोना काळात तुम्ही काय मदत केलीत, असा प्रश्न वारंवार विचारून त्यांना ट्रोल केले जात होते. अखेर बिग बी यांनी मौन सोडले असून ट्रोलर्सच्या प्रश्नांची सविस्तर उत्तर दिली आहेत.

जाहीर केली कामांची यादी 

आपल्या ब्लॉगवर बिग बी म्हणाले, आम्ही लोकांना मदत करतो पण त्याचा गाजावाजा करत नाही. केवळ ज्यांना मदत मिळते त्यांनाच ही गोष्ट माहित असते. पुढे त्यांनी लिहिलेय, माझ्या वैयक्तिक फंडाद्वारे 1500 शेतकऱ्यांच्या बॅंकेतील कर्जाची भरपाई करून त्यांना आत्महत्येपासून रोखले, पुलवामा हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबियांना मदत केली.

बिग बी यांनी पुढे म्हटलंय, गतवर्षी महिनाभर 4 लाख रोजंदारीवरील कामगारांना भोजन दिले, स्थलांतरित कामगारांसाठी बस-ट्रेनची सोय केली, प्रंटलाईन वर्कर्सना पीपीई कीट दिल्या, पालिकेसाठी 20 व्हेंटिलेटर्सची ऑर्डर दिली असून त्यापैकी दहा आज येणार आहेत, कोरोनामुळे अनाथ झालेल्या दोन मुलांना दत्तक घेतले, श्रीगुरुतेगबहादूर कोविड सेंटरला दोन कोटी रुपये दिल्याचे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या