
बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मिडियावर नेहमी सक्रिय असतात. नुकताच त्यांनी सोशल मिडियावर एक गमतीदार व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांच्याच गाजलेल्या ’अग्निपथ’ या चित्रपटावरून हा गमतीदार व्हिडीओ तयार करण्यात आला असून यात डब्ल्यूडब्ल्यूईचा सुपरस्टार रेसलर अंडरटेकर चक्क आपले नाव ’विजय दीनानाथ चौहान’ असल्याचे सांगताना दिसतोय.
बिग बी यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ अवघ्या एका मिनिटांचा आहे. यात अंडरटेकर आणि आणि गोल्डबर्ग रेस्लिंगच्या रिंगमध्ये झळकतायत. त्यांच्यातला संवाद खास ‘अग्निपथ’ स्टाईलमध्ये दाखवण्यात आला आहे. यात रागावलेला गोल्डबर्ग अंडरटेकरला नाव विचारतो तेव्हा तो ’विजय दीनानाथ चौहान… पूरा नाम’ हा अग्निपथमधील लोकप्रिय संवाद बोलताना दिसतोय. बिग बी यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरत असून चाहत्यांनीही त्यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.




























































