
महाराष्ट्राच्या विधीमंडळाचे अधिवेशन 23 फेब्रुवारी पासून सुरू झाले असून आतापर्यंत या अधिवेशनाचा अर्धा टप्पा पार पडला आहे. हे अधिवेशन 25 मार्च रोजी संपणार आहे. आतापर्यंत या अधिवेशनात एकदाही दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनावर चर्चा झालेली नाही. यावरून अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
अमोल मिटकरी यांनी X वर एक पोस्ट शेअर करत राज्य सरकारवर निशाणा साधला. ”आजही आदरणीय दादांच्या विमान दुर्घटने बाबत सभागृहाच्या कामकाजात चर्चा नाही. अर्धे अधिवेशन संपले पण दादांच्या विमानाचा अपघात की घातपात ही चर्चा महाराष्ट्राच्या सभागृहात न होणे ही बाब वेदनादायी व तितकीच चिंताजनक आहे. नेमक पाणी कुठे मुरतय तेच कळेना. राजकारण खरच वंगाळ असत हे दादांचे शब्द खरे ठरलेत. लोकनेत्याचे दुर्दैव”, असे मिटकरी यांनी ट्विट केले आहे.























































