
मुंबई संघाचा माजी दिग्गज क्रिकेटपटू अमोल मुझुमदार याची मुंबई क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदी निवड करण्यात आली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून मंगळवारी याची घोषणा करण्यात आली.
रमेश पोवार याच्या मार्गदर्शनात मुंबई संघाने या वर्षी छान कामगिरी केली होती. पण रमेश पोवार याची हिंदुस्थानच्या महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदी निवड झाल्यामुळे मुंबई संघाच्या प्रशिक्षक पदाची जागा रिकामी झाली. त्यानंतर क्रिकेट सुधारणा समितीने अमोल मुझुमदार याची या पदासाठी निवड केली. या समितीत जतीन परांजपे, विनोद कांबळी आणि निलेश कुलकर्णी यांचा समावेश होता.






























































