सिनेट निवडणुकीत अमोल पाटील, विष्णू भंगाळे विजयी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर नोंदणीकृत पदवीधरांमधून खुल्या संवर्गातून अमोल पाटील आणि विष्णू भंगाळे हे दोघे पहिल्या फेरीत निवडून आले आहेत. उर्वरित 3 जागांसाठी मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

खुल्या संवर्गातून 5 जागा निवडून द्यावयाच्या आहेत. या संवर्गात 9 हजार 779 मते वैध ठरली, तर 1 हजार 362 मते अवैध ठरली. निवडून येण्यासाठी 1 हजार 630 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला.  पहिल्या फेरीत अमोल पाटील यांना 2 हजार 51 तर विष्णू भंगाळे यांना 1 हजार 686 मते प्राप्त झाली. निर्धारित कोटय़ापेक्षा जास्त मते पडल्यामुळे या दोघांना निवडून आल्याचे घोषित करण्यात आले.  विष्णू भंगाळे यांचे शिवसेना नेते आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी अभिनंदन केले.