लाचखोरीत अमरावती विभाग अव्वल

349

सरकारी कार्यालयात लाच घेतल्याच्या प्रकरणी अमरावती विभागाच्या महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकाविला आहे. 1 जानेवारी ते 30 नोव्हेंबर दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने केलेल्या कार्यवाहीवरुन हे स्पष्ट झाले आहे. यात पोलीस व महसुल विभाग लाच घेण्यात पहिल्या क्रमाकांवर असून दुसर्‍या क्रमाकांवर ग्रामविकास विभाग तर तिसर्‍या क्रमाकांवर जिल्हा परिषदेचा नंबर लागतो.

1 जानेवारी ते 30 नोव्हेंबर या काळात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकुण 102 ठिकाणी धाडी टाकून ट्रॅप यशस्वी केले आहे. यात 139 लाचखोरांना अटक करण्यात आली आहे. त्यानुसार अमरावती जिल्ह्यात 28, अकोला 18, यवतमाळ 25, बुलढाणा 17 व वाशीम जिल्ह्यात ट्रॅप यशस्वी झाले आहे. यात पोलीस विभागात 28 तर महसुल विभागात 24 लाचखोरांचा समावेश आहे. यासोबतच ग्रामविकासमध्ये 8 सापळे रचण्यात आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या