अमरावतीत कोरोनाचे दोन बळी, एकूण रुग्णसंख्या आठशे जवळ

335

अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा कहर अद्यापही कायम असताना काल रात्री दोन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अमरावतीत मृतकांची संख्या ३० झाली तर कोरोनाग्रस्तांची संख्या ७८३ पोहोचली आहे.

बेस्ट हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या दोन रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. हबीब नगर येथील ५३ वर्षीय व गौस नगर येथील ६० वर्षीय वृध्दाचा समावेश आहे. दोघांचाही कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गौस नगर येथील ६० वर्षीय इसमाला सारीचा आजार झाला होता. त्यानंतर त्यांची टेस्ट घेण्यात आली ही टेस्ट पॉझिटीव्ह आली होती.त्यांचा मध्यरात्री अडीच वाजता मृत्यू झाला. यासोबतच हबीब नगर येथीलही ५३ वर्षीय इसमाचा अहवाल पॉझिटीव्ह होता. त्यांचा सुध्दा मृत्यू झाला. यासोबतच चपराशीपुरा परिसरात एका ५१ वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या ७८३ झाला आहे.

सद्यास्थितीत कोरोनाचे २३० रूग्ण उपचारार्थ कोविड रूग्णालयात दाखल असून प्रकृती सुधारलेले ५३० रूग्ण घरी गेले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या